Nashik मधील Dr Suvarna Waje मृत्यूप्रकरणी खुलासा, पती संदीप वाजेनेच केली Suvarna Waje यांची हत्या

Nashik मधील Dr Suvarna Waje मृत्यूप्रकरणी खुलासा, पती संदीप वाजेनेच केली Suvarna Waje यांची हत्या

| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 7:31 PM

मुंबई-नाशिक महामार्गावर वाडीव-हे परिसरात 26 जानेवारी रोजी जळालेल्या कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सुवर्णा वाजेंचा मृतदेह आढळला होता. त्याच्या एक दिवस आधी वाजे यांच्या पतीने मिसिंगची पोलिसांत तक्रार दिली होती. वाजे या महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. 

नाशिक : नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे(Suvarna Waje) हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यास अखेर नाशिक पोलिसांना यश आले आहे. सुवर्णा वाजे यांची हत्या पती संदीप वाजेने(Sandeep Waje)च केल्याचे निष्पन्न झाले आहे. कौटुंबिक वादातून पतीने सुवर्णा यांची हत्या केल्याची माहिती मिळते. डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्येप्रकरणी पतीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर वाडीव-हे परिसरात 26 जानेवारी रोजी जळालेल्या कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सुवर्णा वाजेंचा मृतदेह आढळला होता. त्याच्या एक दिवस आधी वाजे यांच्या पतीने मिसिंगची पोलिसांत तक्रार दिली होती. वाजे या महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत होत्या.