ED Raid In Nalasopara : एकाचवेळी 13 ठिकाणी ईडीचे छापे; नालासोपारात खळबळ
Nalasopara, Vasai Virar ED Raids : नालासोपारा येथे काल वेगवेगळ्या ठिकाणी ईडीचे छापे पडले आहेत. यात बविआचे माजी नगरसेवक आणि भाजप कार्यकर्त्याचा देखील समावेश आहे.
नालासोपारा येथे काल वेगवेगळ्या ठिकाणी ईडीचे छापे पडले आहेत. एकाचवेळी तब्बल 13 ठिकाणी हे छापे मारण्यात आलेले आहेत. यात बविआचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि भाजप कार्यकर्ते विवेक तिवारी यांच्या घरी देखील ईडीची धाड पडली आहे. तसंच वसईच्या मधुबन येथील राम राहील ऑक्वर्ड इमारतीच्या 701, 702, 703 या सदानिकांमध्येही चौकशी करण्यात आलेली आहे. बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत ईडीने वसई-विरारमधील 13 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली आहे. बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत ईडीने वसई-विरारमधील 13 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली आहे. दरम्यान, या छापेमारीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Published on: May 15, 2025 09:03 AM
