वसई-विरार महानगरपालिका आयुक्तांवर ईडीची धाड! १२ ठिकाणांवर शोधमोहीम
वसई-विरार मनपाचे माजी आयुक्तांच्या घरी आज सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वसई-विरार परिसरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी सकाळी मनपाचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणांवर छापेमारी केली. काल सत्कार आणि समारोपाचा कार्यक्रम झाल्यावर आज ईडीच्या या कारवाईमुळे वसईत आणि मनपा अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, नाशिक, वसई आणि विरार येथील ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली. यातील बहुतांश छापे हे पवार यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर टाकण्यात आले आहेत.
वसई-विरार परिसरात मंगळवारी पहाटेपासून ईडीने छापेमारी सुरू केली असून, याबाबत कमालीची गोपनीयता राखली गेली आहे. एकाच वेळी १२ ठिकाणांवर शोधमोहीम सुरू झाली आहे. पवार यांच्या निवासस्थानावरही ही कारवाई सुरू असून, ती उशिरापर्यंत चालेल, असे सूत्रांनी सांगितले.
Published on: Jul 29, 2025 02:35 PM
