Navi Mumbai : तुम्ही असा पाव तर खात नाही ना! अळ्या अन् अस्वच्छ पाणी… नवी मुंबईतील Video बघूनच येईल किळस
नवी मुंबईच्या इडन बेकरीतील पावात अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत ही बेकरी परवान्याविना आणि अनधिकृतपणे सुरू असल्याचे समोर आले. पाव बनवण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर होत असल्याचेही उघडकीस आले आहे.
नवी मुंबईतील इडन बेकरीमधील पावमध्ये अळ्या आढळल्याच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारानंतर ठाकरे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तातडीने या बेकरीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, इडन बेकरी अनधिकृतपणे सुरू असून, तिच्याकडे कोणत्याही प्रकारचा वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
परवाना नसतानाही ही बेकरी खाद्यपदार्थांचे उत्पादन करत होती. या तपासणीत आणखी एक गंभीर बाब उघडकीस आली ती म्हणजे, पाव बनवण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर केला जात होता. सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असलेल्या या प्रकारामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या अशा आस्थापनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
