Eknath Khadse : नाथाभाऊंच्या घरातील 7 सीड्या चोरीला पण ‘ती’ CD शाबूत, खडसेंचा आरोप काय?

Eknath Khadse : नाथाभाऊंच्या घरातील 7 सीड्या चोरीला पण ‘ती’ CD शाबूत, खडसेंचा आरोप काय?

| Updated on: Oct 29, 2025 | 5:58 PM

एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी चोरी झाली आहे. चोरट्यांनी दागिन्यांसह सात सीडी लंपास केल्याचा खडसेंचा आरोप आहे. चोरी करण्यापूर्वी रस्त्यावरील पथदिवे बंद झाल्याने कटाचा संशय व्यक्त होत आहे. खडसेंनी पूर्वी महाराष्ट्रात भूकंप घडवणाऱ्या सीडी असल्याचा दावा केला होता, ज्यामुळे चोरीच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील बंगल्यात नुकतीच चोरी झाली. चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यामध्ये सात तोळे सोने, दोन किलो चांदी आणि ड्रॉवरमधील सात सीडी चोरून नेल्याची माहिती आहे. मात्र, ही चोरी दागदागिन्यांसाठी नव्हे, तर गोपनीय सीडी मिळवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दहा सीडी नेण्यात आल्या असून, सात सीडी अजूनही उपलब्ध आहेत. महत्त्वाची सीडी आपल्याकडे सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केला. या चोरीपूर्वी रस्त्यावरील पथदिवे अचानक बंद पडल्याचे समोर आले आहे.

रात्री १२ वाजून ४२ मिनिटांनी पथदिवे बंद झाले आणि त्यानंतर रात्री १ वाजून ५४ मिनिटांनी चोरटे खडसे यांच्या घरात शिरले. सुमारे एक तास त्यांनी चोरी करून पहाटे ३ वाजून ५ मिनिटांनी पळ काढला. या घटनेमुळे पथदिवे बंद होण्यामागे घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खडसे यांच्या दाव्यानुसार, दोन महिन्यांपूर्वी त्यांनी प्रफुल्ल लोढा यांच्याकडे महाराष्ट्रात भूकंप घडवणाऱ्या सीडी असल्याचा उल्लेख केला होता, त्यानंतर त्यांच्या जावयांना पुण्यात अटक झाली होती. आता घरातून सीडी चोरीला गेल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

Published on: Oct 29, 2025 05:58 PM