Eknath Shinde : नगरपरिषदेच्या प्रचारात नेत्यांकडून ‘लाव रे तो फोन’, सभेतून उपमुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना थेट कॉल अन्….

Eknath Shinde : नगरपरिषदेच्या प्रचारात नेत्यांकडून ‘लाव रे तो फोन’, सभेतून उपमुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना थेट कॉल अन्….

| Updated on: Nov 28, 2025 | 10:36 PM

नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात नेत्यांनी थेट सभेतून मंत्र्यांना फोन लावण्याचा नवीन ट्रेंड सुरू केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमआयडीसी, रुग्णालये आणि प्रदूषणाबाबत मंत्र्यांना फोन केले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी फोनद्वारे आवाहन केले.

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एक नवीन प्रचार शैली समोर आली आहे. अनेक नेत्यांनी आपल्या प्रचारसभांमधून थेट संबंधित मंत्र्यांना फोन करून मतदारांच्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध सभांमधून मंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना फोन केले. त्यांनी एमआयडीसी उभारणी, रुग्णालयांची दुरुस्ती आणि वायू प्रदूषणावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. संगमनेर, यवतमाळ आणि पाचोरा येथील सभांमध्ये त्यांनी नागरिकांना दिलेल्या आश्वासनांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

दुसरीकडे, सांगली जिल्ह्यातील जत येथे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. फडणवीस यांनी फोनवरून भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. आरळी यांना निवडून देण्याचे आवाहन केले. या माध्यमातून मतदारांना तातडीने आश्वासने देऊन राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचाराला वेगळी दिशा दिली आहे.

Published on: Nov 28, 2025 10:36 PM