BMC निवडणुकीसाठी शिंदेंची अमित शाहंकडे इतक्या जागांची मागणी? ‘सह्याद्री’वरील भेटीत काय घडलं?

BMC निवडणुकीसाठी शिंदेंची अमित शाहंकडे इतक्या जागांची मागणी? ‘सह्याद्री’वरील भेटीत काय घडलं?

| Updated on: May 28, 2025 | 9:22 AM

येत्या काही दिवसात राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढायचं की, युती करुन याची चाचपणी करण्याचे निर्देश शाह यांनी भाजप नेत्यांना दिले आहेत.

येत्या काही दिवसात महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अशातच राजकीय वर्तुळात राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट झाली. सह्याद्रीवर झालेल्या भेटीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी केल्याची सूत्रांनी माहिती दिली. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे १०७ जागांची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २२७ जागांपैकी १०७ वॉर्डात उमेरदवार तयार असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंकडून ही मागणी करण्यात आल्यानंतर अमित शाहांकडून त्यांना कोणतंही ठोस आश्वासन देण्यात आलं नसल्याचेही सूत्रांकडून कळतंय.

Published on: May 28, 2025 09:02 AM