Eknath Shinde : …अन् विमानतळावर उतरताच शिंदे सुसाट पळतच सुटले, VIDEO व्हायरल; नेमकं घडलं काय?

| Updated on: Nov 28, 2025 | 12:23 PM

एकनाथ शिंदे यांना शिर्डी येथील सभेत पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागली. संगमनेर येथील सभेला अवघे पाच मिनिटे बाकी असताना ते सभास्थळी पोहोचले. आचारसंहितेची वेळ मर्यादा पाळण्यासाठी शिंदे आणि पोलिसांची ही धावपळ पाहायला मिळाली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच शिर्डीतील सभेला पोहोचण्यासाठी लगबग पाहायला मिळाली. संगमनेर येथे आयोजित कालच्या सभेसाठी एकनाथ शिंदे अवघे पाच मिनिटे असतानाच सभास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे सभेच्या वेळेचे काटेकोरपणे पालन करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून यतोय. आचारसंहितेच्या कडक नियमांची अंमलबजावणी लक्षात घेता, सभेच्या निश्चित वेळेत पोहोचणे आवश्यक होते. या मर्यादा पाळण्यासाठी शिंदे यांच्यासोबत त्यांच्या सुरक्षा दलातील पोलीस कर्मचाऱ्यांचीही मोठी धावपळ झाली.

राजकीय नेत्यांना जाहीर सभांमध्ये वेळेचे बंधन पाळावे लागते, विशेषतः निवडणुका आणि आचारसंहितेच्या काळात, जेव्हा प्रत्येक मिनिटाचे महत्त्व असते. या प्रसंगातून उपमुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचे पालन किती गांभीर्याने घेतले, हे दिसून येते. दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

Published on: Nov 28, 2025 12:03 PM