Sanjay Shirsat : दलाल असा उल्लेख करत संजय शिरसाटांचा जलील यांच्यावर निशाणा; म्हणाले, असे खूप…

Sanjay Shirsat : दलाल असा उल्लेख करत संजय शिरसाटांचा जलील यांच्यावर निशाणा; म्हणाले, असे खूप…

| Updated on: Jun 11, 2025 | 3:29 PM

इम्तियाज जलील यांनी शहानिशा न करता संजय शिरसाट यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. असं म्हणत इम्तियाज जलील यांच्या घरावर शेण फेक करण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात आहे.

असे खूप येतात, असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. इतकंच नाहीतर असे दलाल मार्केटमध्ये भरपूर येतात, अशी जिव्हारी लागणारी टीका देखील संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर केली आहे. संजय शिरसाट यांनी नियम डावलून शेंद्रा एमआयडीसीमध्ये सहा कोटींची जागी घेतली. मुलाच्या नावाने संजय शिरसाट यांनी ही जागा आहे, असा आरोप गेल्या काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर केला होता.

तर दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपांमुळे छत्रपती फाऊंडेशनचे सुनील रत्नपारखे यांनी जलील यांच्या घरावर शेण फेक करण्याचा इशारा दिला होता. मात्र जालना छत्रपती संभाजी नगर सीमेवर शेकटा शिवारात जालन्याच्या कदिम पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

Published on: Jun 11, 2025 02:08 PM