Eknath Shinde : मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा पाचवा दिल्ली दौरा, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा पाचवा दिल्ली दौरा, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

| Updated on: Jul 27, 2022 | 8:30 PM

दिल्लीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आतापर्यंत जवळपास पाच वेळा दिल्लीचा दौरा केलाय.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडं रवाना झालेत. दिल्लीमध्ये शिंदे हे भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेणार आहेत. शहा-शिंदे यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एक ऑगस्टच्या सुनावणीवर चर्चादेखील होण्याची शक्यता आहे. मला कोणत्याही खात्याची आवश्यकता नाही, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं. मला कोणतही खात दिलं नाही, तरी मी नाराज होणार नाही, असं केसरकर यांनी म्हटलं. त्यामुळं दिल्लीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आतापर्यंत जवळपास पाच वेळा दिल्लीचा दौरा केलाय. मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर शिंदे यांनी त्यांचा पहिला दौरा केला होता. दुसऱ्यांदा शिंदे गटात सामील झालेल्या खासदारांची भेट घेण्यासाठी शिंदे दिल्लीला गेले होते. तिसऱ्या दौरा त्यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या डीनर पार्टीत सहभाग घेण्यासाठी केला. चौथा दौरा हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले होते.

Published on: Jul 27, 2022 08:30 PM