Badlapur sexual assault case : आरोपी अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर! 5 पोलीस हत्येत अडकणार?
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या संदर्भात न्यायालयीन चौकशीचा एक अहवाल हायकोर्टात सादर झाला. त्यावरून हा फेक एन्काऊंटर असल्याचे समोर आले आहे. इतकंच नाहीतर अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलंय.
बदलापूर येथील शाळेत लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर फेक होता, हे आता अहवालातून सिद्ध झालं आहे. न्यायालीन चौकशीचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आलाय. ज्यात एन्काऊंटर करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदेंसह पाच पोलिसांना अक्षय शिंदेच्या मृत्यूला जबाबदार धरण्यात आलंय. ठाण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक आर शेंडगेंच्या अहवालात पोलिसांवरच ठपका ठेवण्यात आलाय. अक्षयवर केलेला गोळीबार हा अन्यायकारक आणि संशयास्पद आहेत. बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट्स नाहीत, असं फॉरेन्सिक अहवालात म्हटलंय. तर पोलिसांवर कायदेशीर कारवाई करू, असं सरकारी वकिलांनी हायकोर्टात सांगितलं आहे. म्हणजेच त्या पाच पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल होईल. या पाच जणांमध्ये पोलीस निरीक्षक संजय शिंदे, पीएसआय निलेश मोरे, हवालदार हरीष तावडे, हवालदार अभिजीत मोरे आणि हेड कॉन्स्टेबल सतीश खताळ हे असून त्यांच्यावर खटला चालवला जाईल. गेल्या वर्षी १२ आणि १३ ऑगस्टला ३ वर्षांच्या दोन चिमुकलींवर बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचार झालेत. त्यावेळी पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेल अटक केली होती. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट..
