मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा एकमेव आमदार लोकसभा लढतोय, हर्षवर्धन जाधव कोठून उभे राहणार ?

| Updated on: Mar 31, 2024 | 9:25 PM

मराठा आरक्षणासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारे एकमेव आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आता लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आता अपक्ष म्हणून लढायचा निर्धार केला आहे.

संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारे एकमेव आमदार हर्षवर्धन जाधव आता लोकसभा लढणार आहेत. के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला असला तरी माजी आमदार हर्षवर्धन अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. छत्रपती संभाजीनगरातून ते लोकसभा लढविणार असल्याने आता छत्रपती संभाजीनगरात अटीतटीची लढाई होणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने येथे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिले आहे. तर महायुतीने अद्यापही येथील उमेदवार जाहीर केलेला नाही. ज्यांना पाडायचे आहे त्यांना पाडा. ज्यांनी कामे केली त्यांना निवडून आणा, ज्यांनी कामे केलेली नाहीत त्यांना निवडून पाडा असे हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेला मी एकमेव आमदार आहे. आता देशोधडीला लागलो आहे. शेतकऱ्यांचे काम मी करतोय, वीज बील, पिक विमा, पीक कर्ज, पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलने करतोय. म्हणून सर्वसामान्यांसाठी आपण अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 31, 2024 09:23 PM