Puntamba Farmer Protest | पुणतांब्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा एल्गार, विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु

| Updated on: Jun 01, 2022 | 12:09 PM

हंगाम संपत आला तरी शेतात ऊस उभा आहे, कांद्याला भाव नाही. द्राक्ष, टरबूज रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली, तसंच वीज संकटामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. असं असलं तरी सरकारकडून शेतकऱ्यांची दखल घेतली जात नसल्यामुळे पुणतांब्यातील शेतकरी आंदोलनाला बसले आहेत.

Follow us on

पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी एल्गार पुकारला आहे. अहमदनर जिल्ह्यातील पुणतांबा गावीतील शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केलीय. हंगाम संपत आला तरी शेतात ऊस उभा आहे, कांद्याला भाव नाही. द्राक्ष, टरबूज रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली, तसंच वीज संकटामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. असं असलं तरी सरकारकडून शेतकऱ्यांची दखल घेतली जात नसल्यामुळे पुणतांब्यातील शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. पाच दिवस हे आंदोलन सुरु राहणार आहे. यापूर्वी 2017 मध्येही पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. त्या आंदोलनाचं लोण पाहता पाहता राज्यभर पसरलं आणि ऐतिहासिक शेतकरी आंदोलन म्हणून त्याची नोंद झाली होती.

आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

ऊसाला एकरी एक हजार रुपये अनुदान द्यावं, शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रुपये द्यावेत, कांद्याला हमीभाव द्यावा, कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान द्यावं, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात यावी, थकित वीज बिल माफ करण्यात यावं, यासह अनेक महत्वाच्या मागण्यांसाठी पुणतांब्यातील शेतकरी आंदोलनाला बसले आहेत.