Ahmednagar | कर्जाला कंटाळून केडगावमध्ये पती-पत्नीसह मुलीने केली आत्महत्या

Ahmednagar | कर्जाला कंटाळून केडगावमध्ये पती-पत्नीसह मुलीने केली आत्महत्या

| Edited By: | Updated on: Sep 06, 2021 | 3:44 PM

अहमदनर जिल्ह्यातील केडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने 10 वर्षाच्या पोटच्या मुलीची हत्या करुन आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. कर्जाला कंटाळून त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.

अहमदनर जिल्ह्यातील केडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने 10 वर्षाच्या पोटच्या मुलीची हत्या करुन आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. कर्जाला कंटाळून त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. पण त्यांनी केलेल्या या कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृतक दहा वर्षीय मुलीचं मैथिली फाटक असं नाव आहे. तर तिच्या 40 वर्षीय वडिलांचं संदीप फाटक असं नाव आहे. तर आईचं किरण फाटक (वय 32) असं नाव आहे.

संदीप फाटक यांनी आधी आपल्या मुलीची हत्या केली. त्यानंतर फाटक दाम्पत्याने आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. दुसरीकडे पतीने मुलीसोबत पत्नीची देखील हत्या केली का? याचा तपास पोलीस करत आहेत. केडगाव देवी रोडवरील अथर्व नगर ठुबे मळा येथील फाटक कुटुंबात हा प्रकार घडलाय. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.