Mumbai Police : महिला पोलिसाची अरेरावी, नाव विचारलं तर वर्दीवरचा बॅच फेकून मारला अन्.. बघा व्हायरल VIDEO
मुंबईतील व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात एका महिला पोलिसाने तक्रारदार महिलेवर हल्ला केल्याच्या व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. तक्रार नोंदणीबाबत विचारणा केल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खरडे यांनी तक्रारदार महिलेवर नेम प्लेट आणि बॅच फेकून मारहाण केल्याचा आरोप आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मुंबईतील व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, यावेळी महिला पोलिसाने तक्रार स्वीकारण्यास नकार दिला, तक्रार स्वीकारण्यास नकार देताच तक्रारदार महिलने महिला पोलिसाला जाब विचारला. यावर महिला पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे चांगल्याच आक्रमक झाल्यात. यावेळी तक्रारदार महिलेने पोलीस महिलेला नाव विचारले असता तिला वर्दीवरील नेम प्लेट आणि बॅच फेकून मारली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळत आहेत. व्हिडीओमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याचा आक्रमक वागणूक स्पष्ट दिसून येत आहे. या घटनेमुळे मुंबई पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. घटनेचा तपास सुरू असून पुढील कारवाईची वाट पाहण्यात येत आहे.
Published on: Sep 22, 2025 12:20 PM
