Samruddhi Expressway : देशातला सर्वात मोठा बोगदा, 32 मोठे पूल; समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण
Samruddhi Mahamarg Inauguration : इगतपुरी - आमने या समृद्धी महामार्गाच्या 76 किमीच्या शेवटच्या टप्प्याचं आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन होणार आहे. इगतपुरी – आमने हा शेवटचा 76 किमीचा टप्पा आज प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. मुंबई ते नागपूर असा हा 107 किलोमीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग आहे.
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण केलं जाणार आहे. त्यासाठीची पूर्ण तयारी आता झालेली आहे. इगतपुरी – आमने हा 76 किमीचा शेवटचा टप्पा आहे. या महामार्गावर देशातील सर्वात मोठा 11 किमीचा बोगदा देखील तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या दृष्टीने सर्वाधिक उंच खांबावर असलेला पूल आणि 32 मोठे पूल, 25 इंटरचेंज, 6 किलोमीटर ओव्हर पास तयार करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण घोटीतील दत्त मंदिराजवळील शेलार येथे आज दुपारी 12 वाजता होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित असणार आहेत.
