राष्ट्रवादीचे संजय कदम ठाकरे गटात प्रवेश करणार?

राष्ट्रवादीचे संजय कदम ठाकरे गटात प्रवेश करणार?

| Updated on: Jan 19, 2023 | 12:28 PM

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून खेळी करण्यात आली असून पुढील १५ दिवसांत संजय कदम यांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून खेळी करण्यात आली असून पुढील १५ दिवसांत संजय कदम यांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम ठाकरे गटात आल्यानंतर कोकणातील ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. तसेच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी संजय कदम यांचा ठाकरे गटाला फायदा होणार आहे. त्याशिवाय राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार आहे. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हजर राहण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.