महायुतीचा विधीमंडळ समिती वाटपाचा फॉर्म्युला ठरला, समित्यांवर कोणाची लागणार वर्णी?

महायुतीचा विधीमंडळ समिती वाटपाचा फॉर्म्युला ठरला, समित्यांवर कोणाची लागणार वर्णी?

| Updated on: Mar 05, 2025 | 12:02 PM

महायुतीच्या नेत्यांनी समन्वय समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीत महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधिमंडळ समितीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आता तिसरा दिवस आहे. मात्र गेले दोन दिवस अधिवेशनाचे चांगलेच वादळी ठरल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी समन्वय समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीत महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधिमंडळ समितीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली. महायुतीच्या समन्वय समितीच्या नेत्यांची बैठक मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला भाजपकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत, संदीपान भुमरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे हे नेते बैठकीसाठी उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत महायुतीचा विधिमंडळ समितीसाठीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. भाजपाला ११, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४ समित्या मिळणार आहे. तर उर्वरित ७ समित्यांबाबत निर्णय अजूनही बाकी असल्याची माहिती समोर येत आहे. तर या समित्यांवर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद हुकलेल्या भाजप आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महामंडळ वाटपावरून महायुतीत अजूनही रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे.

Published on: Mar 05, 2025 12:02 PM