Raosaheb Danve : दानवेंच्या नातवानं भाजप पदाधिकाऱ्याला 10 कोटींचा लावला चूना अन्… प्रकरण काय?

Raosaheb Danve : दानवेंच्या नातवानं भाजप पदाधिकाऱ्याला 10 कोटींचा लावला चूना अन्… प्रकरण काय?

| Updated on: Nov 02, 2025 | 2:15 PM

नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी कैलास अहिरे यांची १० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम मुकेश पाटील यांच्यासह आठ जणांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एन.व्ही. ऑटो स्पेअर्स कंपनीच्या शेअर व्यवहारात हा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.

नाशिकमध्ये भाजपचे पदाधिकारी आणि उद्योजक कैलास अहिरे यांच्या तक्रारीवरून १० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम मुकेश पाटील यांच्यासह आठ जणांविरोधात नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे.

एन.व्ही. ऑटो स्पेअर्स या कंपनीच्या शेअर व्यवहारातून हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. कंपनीतील १४ टक्के शेअर्स २५ कोटी रुपयांना खरेदी करण्याचा व्यवहार ठरला होता. परंतु, तक्रारदारानुसार, १० कोटी रुपये न देताच शेअर्स स्वतःच्या नावावर हस्तांतरित करण्यात आले.

फसवणुकीची रक्कम डमी खात्यातून वळवण्यात आल्याचेही उघड झाraosaheb danaveले आहे. कैलास अहिरे यांची दिशाभूल करून ही फसवणूक करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणात गिरीश पवार आणि अन्य काही साथीदारांचाही समावेश आहे. सातपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Published on: Nov 02, 2025 01:56 PM