जीबन कुमार यांची यशोगाथा… Tata Ace सोबत उभारले व्यवसायाचे साम्राज्य
2017 साली त्यांनी कॉर्पोरेट नोकरी सोडून आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. एक नवीन कल्पना घेऊन त्यांनी कचरा व्यवस्थापनाशी संबंधित अन्न वितरण सेवा सुरू केली.
JS Enviro Services Private Limited चे संस्थापक जीबन कुमार उपाध्याय यांनी त्यांची प्रगती अनेकांसाठी प्रेरणादायी बनवलीय. त्यांनी मेहनतीच्या जोरावर कचरा व्यवस्थापनाला एका यशस्वी व्यवसायात रूपांतरित केलंय.
2017 साली त्यांनी कॉर्पोरेट नोकरी सोडून आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. एक नवीन कल्पना घेऊन त्यांनी कचरा व्यवस्थापनाशी संबंधित अन्न वितरण सेवा सुरू केली. जीबन कुमार यांचा हा प्रवास सोपा नव्हता, पण त्यांच्या ध्येय, उद्दिष्ट आणि मिशनबाबतची स्पष्टता यामुळे त्यांनी कठीण प्रसंगांनाही सामोरं जाण्याचं धैर्य मिळवलं.
2022 मध्ये त्यांना एक मोठं यश मिळालं, जेव्हा त्यांना घराघरांतून कचरा संकलन करण्याचं सरकारी कंत्राट मिळालं. त्याच काळात Tata Ace त्यांच्या व्यवसायात दाखल झालं. Tata Ace मुळे त्यांना अपार विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि ग्राहकांचा विश्वास मिळाला.
Tata Ace ला आपला भागीदार बनवताना, जीबन कुमार यांनी अभिमानाने म्हटलं, “अब मेरी बारी.” त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
आज JS Enviro Services Pvt. Ltd. हे नाव टिकाऊ कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उगम पावणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये घेतलं जातं, आणि Tata Ace ही त्यांच्या यशस्वी कार्यप्रणालीचा कणा बनली आहे.