Maharashtra Election Results 2026 : महापौर साहेब… निकालापूर्वीच विजयाची बॅनरबाजी, पुण्यात तुफान चर्चा

Maharashtra Election Results 2026 : महापौर साहेब… निकालापूर्वीच विजयाची बॅनरबाजी, पुण्यात तुफान चर्चा

| Updated on: Jan 16, 2026 | 8:50 AM

पुणे महापालिकेच्या मतमोजणीपूर्वी प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवार गणेश बिडकर यांचे महापौर साहेब असे बॅनर पुण्यात झळकले आहेत. कार्यकर्त्यांकडून लावण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, निकालाआधीच लागलेल्या या बॅनरमुळे शहरात चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाला पुणे महापालिकेत एकहाती सत्ता मिळेल, असा विश्वास त्यांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

पुणे महापालिकेच्या मतमोजणीला अवघ्या काही वेळात सुरुवात होणार असतानाच, पुण्यातील राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक २४ मधून निवडणूक लढवणारे गणेश बिडकर यांचे महापौर साहेब अशा आशयाचे बॅनर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. निकालापूर्वीच असे बॅनर लागल्यामुळे नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. हे बॅनर गणेश बिडकर यांच्या कार्यकर्त्यांनी लावल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, अंतिम निकाल येण्याआधीच संभाव्य विजयाची घोषणा करणारे बॅनर झळकल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भारतीय जनता पक्षाने पुणे महापालिकेत एकहाती सत्ता मिळवणार असल्याचा दावा केला आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोलचे आकडे समोर येत असले तरी, भाजपला पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. आता पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार का आणि कारभारी कोण असणार हे काही वेळातच स्पष्ट होईल.

Published on: Jan 16, 2026 08:50 AM