Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचा मर्डर होणार होता, पण भय्यू महाराजांमुळे… बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबत एका बड्या नेत्यानं खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाल्या आहेत.
धनंजय मुंडे यांचा इंदौरमध्ये खून होणार होता पण दिवंगत भय्यूजी महाराज यांच्यामुळे ते वाचले, असं वक्तव्य करत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आलं आहे. रत्नाकर गुट्टे म्हणाले, धनंजय मुंडे तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता पण दिवंगत भय्यूजी महाराज यांनी तुम्हाला वाचवलं तुम्ही कोणत्या हॉटेलवर होते याची देखील मला माहिती आहे पण मी सगळेच आता काढणार नाही, असं म्हणत इशारा दिला.
तर तुम्ही सुरुवात केली आहे पण शेवट मी करणार आहे. तुम्ही मला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला तुम्ही माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली त्यांच्यासाठी किती ताकद लावली हे देखील मला माहित आहे पण माझी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनता हीच माझं बुलेटप्रूफ जॅकेट आहे त्यामुळे माझा पराभव होऊ शकला नाही की मी प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याचे गुट्टे यांनी म्हटलं.