VIDEO : Nashik मधील गंगापूर धरण 100 टक्के भरलं

| Updated on: Sep 28, 2021 | 12:18 PM

गेल्या चार ते पाच दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आता हे गंगापूर धरण 100 टक्के भरले आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्प्याने वाढविण्यात येत आहे.  नाशिककडे सुरुवातीला पाठ फिरवणाऱ्या पावसाने दुसऱ्या टप्प्यात जोरदार बॅटींग सुरू केली आहे.

Follow us on

गेल्या चार ते पाच दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आता हे गंगापूर धरण 100 टक्के भरले आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्प्याने वाढविण्यात येत आहे.  नाशिककडे सुरुवातीला पाठ फिरवणाऱ्या पावसाने दुसऱ्या टप्प्यात जोरदार बॅटींग सुरू केली आहे. त्यामुळे नांदगाव, साकुरी या गावामध्ये दोनदा पूर आला आहे. यापूर्वी गोदावरीला एक पूर येऊन गेला आहे. गंगापूर धरण 100 टक्के भरले असल्यामुळे आता पाण्याचा प्रश्न मात्र मिटला आहे. मालेगाव तालुक्यातल्या साकोरीला मुसळधार पावसाने झोडपले आहे. सगळ्या गावात पाणी शिरले होते.