उत्सवालाही शिस्त हवी, काय म्हणाले अभिनेते सुबोध भावे

उत्सवालाही शिस्त हवी, काय म्हणाले अभिनेते सुबोध भावे

| Updated on: Aug 27, 2025 | 1:12 PM

मराठी अभिनेते सुबोध भावे यांच्या पुण्यातील घरी गणपती बाप्पाचं आगमन झाले आहे. सुबोध भावे यांनी पुण्यात लांबणाऱ्या गणपतीच्या मिरवणूकांवर देखील भाष्य केले आहे.

गणपती बाप्पा यांच्या स्वागतासाठी संपूर्ण मुंबापुरीसह पुणे आणि संपूर्ण देशवासीय सज्ज झालेले आहेत. अनेक सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींचे आगमन झाले आहे किंवा होत आहे. अनेक कलाकारांच्या आणि राजकीय मंडळींच्या घरात श्री गणरायाचे आगमन झाले आहे. प्रयोगशील अभिनेते सुबोध भावे यांच्या पुण्यातील घरातही गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. पुण्याच्या गणपती उत्सवाला मोठा इतिहास आहे. सुबोध भावे यांच्या पुण्यातील घरात बाप्पांचे आगमन झाले आहे. यंदा सुबोध भावे यांनी कार्तिक आणि गणपती यांच्या शर्यतीचा देखावा साकारला आहे. कार्तिक पृथ्वीला प्रदक्षिणा घालतात तर बालगणेश त्यांचे आई-वडीलांची प्रदक्षिणा घालतात. यावरुन आपल्या आई-वडीलांना कसे आपण सांभाळायला हवी अशी शिकवण बाप्पा दिल्याचे भावे यांनी सांगितले. पुण्यातील गणेश मिरवणूका 36 तास लांबतात.त्यावरुन टीका होत आहे, यावरही कार्य कोणतेही असो घरचे असो वा सार्वजनिक ते शिस्तबद्ध आणि वेळेतच संपायला हवे असे परखड मत सुबोध भावे यांनी व्यक्त केले आहे.

Published on: Aug 27, 2025 01:12 PM