Gautami Patil : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढल्या, कार अपघाताप्रकरणी मोठी अपडेट, ड्राईव्हरच्या रक्ताचे…

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढल्या, कार अपघाताप्रकरणी मोठी अपडेट, ड्राईव्हरच्या रक्ताचे…

| Updated on: Oct 04, 2025 | 2:30 PM

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारने 30 सप्टेंबर रोजी रिक्षाला धडक दिल्यानंतर, तिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्या कुटुंबियांनी कारवाईची मागणी केली आहे.

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार अपघातामुळे तिच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 30 सप्टेंबर रोजी गौतमी पाटीलच्या मालकीच्या कारने एका रिक्षाला धडक दिली, यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी चालकाने अमली पदार्थांचे सेवन केले होते का, याचा तपास केला जाणार आहे. चालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास वर्ग करण्यात आला आहे.

अपघातानंतर जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटीलवर कारवाईची मागणी केली आहे. ठाकरे शिवसेनेने गौतमी पाटीलला अटक करण्याच्या मागणीसाठी सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही केले. रिक्षाचालकाच्या मुलीने वडिलांच्या उपचाराचा खर्च आरोपीने करावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस बजावली आहे. सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील आणि अपघातानंतर क्रेन कोणी बोलावली याचाही तपास केला जाईल.

Published on: Oct 04, 2025 02:30 PM