Girish Mahajan : दिल्लीत जाऊन कोणी लोटांगण घातलं? खडसें टिकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर
Girish Mahajan Slams Eknath Khadse : एकनाथ खडसे यांनी केलेल्या टिकेनंतर आता गिरीश महाजन यांनी देखील खडसेंवर पलटवार केला आहे.
दिल्लीत जाऊन कोणी लोटांगण घातलं आहे सर्वांनी पाहिलं आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हंटलं आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. माझ्या घरात केंद्रीय मंत्री आहे, मला लोटांगण घालायची गरज नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हंटलं होतं. त्यावर आज गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, तुम्ही काय काय केलेल आहे हे सर्वांना माहित आहे. मी काही तुमच्या सारख्या चोऱ्या माऱ्या केलेल्या नाहीत. संपूर्ण राज्याला माहिती आहे जगाला माहिती आहे की कोण जेलमध्ये गेल्यावर दीड वर्ष कोण मध्ये राहिले. सर्वांना माहिती आहे की कोण दिल्लीला गेले, तिथे जाऊन लोटांगण घालून माफ्या मागत आहे, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांच्यावर केलेली आहे.
Published on: May 30, 2025 06:25 PM
