स्वातंत्र्याला 75 वर्ष उलटले, रस्ता 73 वर्षानंतर बनला पण लालपरी काही पोहोचली नाही

| Updated on: May 26, 2023 | 6:55 AM

VIDEO | या गावात वाहतुकीची सोयच नाही, गावकऱ्यांना करावी लागतेय 18 किमी पायपीट

Follow us on

गोंदिया : स्वातंत्र्याला 75 वर्षे लोटली तरी मुरकुटडोह दंडारी गावात अद्यापही एस टी महामंडळाची लालपरी पोहचली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना 18 किलोमीटर सायकल, दुचाकी किंवा पायदळ प्रवास कारवा लागतोय. या गावाच तब्बल 73 वर्षा नंतर गावातील रस्ता तयार झाला. गोंदिया जिल्यातील अतिसंवेदनशील नक्षल ग्रस्थ गाव अशी मुरकुटडोह दंडारी या गावाची ओळख आहे. एकीकडे देशाचे नवीन संसद भवन तयार मात्र आजही आदिवासी अनेक सुविधा पासून वंचित असल्याचं विदारक सत्य पाहायला मिळत आहे. देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव साजरा होत असला आणि देशाला दुसरं नवीन संसद भवन मिळणार असलं तरी मात्र आज अनेक गावात आजही वाहतुकीच्या सोयी सुविधा न पोहचल्याने गावकर्यांना यातना सहन करून प्रवास करावा लागतो .

असच एक गाव आहे महाराष्ट्र राज्याच्या सुरवातीच्या टोक समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्याच्या सालेकसा तालुक्यातील मुरकुटडोह दंडारी. आदिवाशी बहुल नक्षल क्षेत्र अशी या गावाची आजही ओळख असल्याने एस टी माहामंडळाची बस तर सोडा साधी काली पिवळी, ऑटो वाहन देखील या गावात यायला तयार नाही. या गावाची लोक संख्या जवळपास 700 च्या आत आहे .या गावाला लागून मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि महाराष्ट्र या तीन राज्यांची सीमा आहे .मात्र नक्षलांच्या भीतीमुळे या गावात रस्ता देखील नसल्याने 2020 मध्ये या गावाला जाण्याकरिता जवळपास 14 कोटी रुपये खर्चून मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्ता तयार करण्यात आला. मात्र तरी देखील या गावात एस टी महामंडळाची बस येत नसल्याने गावकर्यांनी एसटी बस सुरु करण्यात यावी अशी मागणी आहे.