Karuna Munde : आधी जहरी टीका अन् वारसाच्या वादात मात्र ‘करूणा’?, धनंजय मुंडेंना करूणा मुंडेंची साथ, काय केला मोठा दावा?

Karuna Munde : आधी जहरी टीका अन् वारसाच्या वादात मात्र ‘करूणा’?, धनंजय मुंडेंना करूणा मुंडेंची साथ, काय केला मोठा दावा?

| Updated on: Oct 23, 2025 | 11:10 AM

छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसा वादाला पुन्हा तोंड फोडले आहे. यात करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा देत, तेच गोपीनाथ मुंडेंचे खरे राजकीय वारस असल्याचे म्हटले आहे. राजकारणात वारस विचारांचे असतात, रक्ताचे नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसावरून सुरू झालेल्या वादात आता करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणाऱ्या करुणा मुंडे यांनी आता म्हटले आहे की, गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार धनंजय मुंडेच आहेत. राजकारणातील वारस हे पोटाचे नसून विचारांचे असतात आणि धनंजय मुंडे यांनी ते विचार जपले आहेत, असे करुणा मुंडेंनी स्पष्ट केले. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यात अप्रत्यक्षपणे हा वारसा वाद पुन्हा उकरून काढला होता. मात्र, अद्याप यावर पंकजा मुंडेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून हा राजकीय वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Published on: Oct 23, 2025 11:10 AM