Operation Sindoor : सशस्त्र दलात आता बदल, नवीन नियम जारी झाल्यानं नेमकं काय होणार?

Operation Sindoor : सशस्त्र दलात आता बदल, नवीन नियम जारी झाल्यानं नेमकं काय होणार?

| Updated on: May 28, 2025 | 3:06 PM

देशात काही दिवसांपासून ऑपरेशन सिंदूरची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. अशातच सशस्त्र दलांमध्ये काही नवे नियम जारी करण्यात आले आहेत. समन्वय साधण्यासाठी हे नियम लागू केल्याचे सांगितले जात आहे.

सरकारकडून सशस्त्र दलांमध्ये समन्वय आदेशांची अंमलबजावणी आणि शिस्त राहावी यासाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. यासंदर्भात संसदेच्या 2023 च्या पावसाळी अधिवेशनात विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती. तर 15 ऑगस्ट 2023 ला राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी देखील केली होती. आता या नवीन कायद्याअंतर्गत तयार केलेले नियम अधिकृतपणे राजपत्र अधिसूचनेद्वारे जारी करण्यात आले.

नवीन नियमामुळे काय होणार?

शिस्तीशी संबंधित प्रकरणांमध्ये त्वरित निर्णय होतील.

एकाच प्रकरणामध्ये वेगवेगळ्या लेव्हलवर होणाऱ्या कारवाया टाळता येतील.

सैन्य दलांमधील संघटनात्मक समन्वय आणि कार्यक्षमता सुधारेल.

भारताच्या तिन्ही सैन्य दलांमध्ये परस्पर सहकार्य संयुक्त कार्यपद्धती वाढण्यास मदत होईल.

कमांडर इन चीफ आणि ऑफिसर्स इन कमांड यांना सैनिकांवर शिस्त प्रशासकीय कारवाई करता येणार

Published on: May 28, 2025 03:06 PM