BS Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सिंहगड किल्ल्याचा दौरा करणार

BS Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सिंहगड किल्ल्याचा दौरा करणार

| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 8:46 AM

मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 3 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.  राज्यपाल कोश्यारी यांचा 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट असा तीन दिवसीय पुणे दौरा असणार आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सिंहगड किल्ल्याचा दौरा करणार. राज्यपाल आज सिंहगड दौऱ्यावर जाणार. मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 3 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.  राज्यपाल कोश्यारी यांचा 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट असा तीन दिवसीय पुणे दौरा असणार आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या मराठवाडा दौऱ्यावरुन चांगलाच वाद पेटला होता. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनीही महाविकास आघाडीतील नेत्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. मी संविधानाने दिलेल्या घटनेनुसारच काम करतोय आणि कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं राज्यपालांनी म्हटलं होतं. राज्यपाल कोश्यारी यांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान बैठक नाही तर स्थानिक अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली, असं राज्यपाल म्हणाले. मी कोणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन मंडळांचं काम करतोय, असं राज्यपालांनी स्पष्ट केलं होतं.