Special Report | राज्यपाल मुख्यमंत्र्यांवर नाराज, संघर्ष कोणत्या थराला ?

| Updated on: Dec 29, 2021 | 10:24 PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिलं होतं. तुम्हाला विधीमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. नको त्या उद्योगात पडू नका, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना उत्तर दिलं होतं.

Follow us on

YouTube video player

मुंबई: विधानसभा अध्यक्षाच्या निवडीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पत्रातील तुमचे धमकीवजा शब्द पाहून मी दु:खी आणि निराश झालोय, असं सांगतानाच मी संविधानाचा रक्षक आहे. मला सर्व संविधानिकबाबी तपासून निर्णय घ्यावा लागतो. तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाही, अशी प्रखर आणि तिखट प्रतिक्रियाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिलं होतं. तुम्हाला विधीमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. नको त्या उद्योगात पडू नका, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना उत्तर दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील या धमकीवजा भाषेवरच राज्यपाल कोश्यारी यांनी बोट ठेवून खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे.