Gulabrao Patil | सेना भवन फोडून बघा, आम्ही तुमचे काय फोडू; हे तुमच्या लक्षात येईल : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil | सेना भवन फोडून बघा, आम्ही तुमचे काय फोडू; हे तुमच्या लक्षात येईल : गुलाबराव पाटील

| Edited By: | Updated on: Aug 01, 2021 | 11:21 AM

प्रसाद लाड यांच्या सारख्या व्यापाऱ्याच्या मुखातून सेना भवन फोडण्याचे शब्द शोभत नाहीत आणि हिम्मत असेल तर प्रयोग करून बघा आम्ही तुमचे काय फोडू हे तुमच्या लक्षात येईल असे आव्हान शिवसेना नेते व राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.

प्रसाद लाड यांच्या सारख्या व्यापाऱ्याच्या मुखातून सेना भवन फोडण्याचे शब्द शोभत नाहीत आणि हिम्मत असेल तर प्रयोग करून बघा आम्ही तुमचे काय फोडू हे तुमच्या लक्षात येईल असे आव्हान शिवसेना नेते व राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याचा इशारा दिला आहे.त्यावर    बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,राज्यात सत्तांतर होईल असे भाजपला वाटले परंतु ते होत नसल्याचे दिसत असल्याने आता काहीही करून वातावरण विस्कळीत करण्याचा हा प्रकार आता सुरू आहे, मागेही काही कारण नसताना भाजपचे लोक सेना भवनावर चालून   आले होते,आताही प्रसाद लाड सेना भवन फोडण्याची भाषा करीत आहेत,त्यांना आपले आव्हान आहे , त्यांनी  तारीख कळवावी  आम्ही त्यांचे काय फोडू हे त्यांना समजेल. त्यांच्या सारख्या व्यापारी माणसाला हे शब्द शोभत नाहीत.