4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 PM | 11 November 2021

| Updated on: Nov 11, 2021 | 8:20 PM

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाविषयी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या दाव्यांना अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Follow us on

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाविषयी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या दाव्यांना अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर ठरवला असल्याचं म्हटलं होतं. त्यावर सदावर्ते यांनी हा संप मुंबई उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवलेला नाही, असं म्हटलं. संप करणं हा संविधानानं दिलेला अधिकार आहे. अनिल परब यांचा खोटारपडेपणा सुरु आहे. आदित्य ठाकरे यांच्या सारख्या युवा मंत्र्यानं यामध्ये लक्ष घालावं, अशी अपेक्षा गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केली आहे.

डंके की चोट पर मुंबई उच्च न्यायालयाने कामगारांचा संप हे बेकायदेशीर  ठरविलेला नाहीच, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. आपल्या हक्क अधिकरासाठी लढायचा, संपचा अधिकार संविधानाने दिला आहे. एक मंत्री म्हणून अनिल परब तुमच्याकडूंन खोटारडेपणा किंवा चुकीची माहिती पसरवण्याची अपेक्षा नाही, असं सदावर्ते म्हणाले.