Gunratan Sadavarte : सदावर्तेंच्या गाडीवर कोणी केला हल्ला? ज्यामुळं खड्ड्यात गाडी आदळून पार्ट तुटला
जालना येथे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. धनगर समाजाच्या दीपक बोराडे यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी जाताना हा प्रकार घडला. आंदोलकांनी गाडीच्या काचेवर हात मारला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. धनगर समाजाचे दीपक बोराडे यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. आंदोलकांनी “एक मराठा, लाख मराठा” अशी घोषणा दिली. इतकंच नाहीतर यावेळी आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीला काळे झेंडे देखील दाखवले, संतापलेल्या आंदोलकांनी गाडीच्या काचेवर हात मारला आणि गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे सदावर्ते यांची गाडी खड्ड्यात आदळली आणि गाडीचा खालचा भाग तुटला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर सदावर्ते यांनी बोराडे यांची भेट घेतली.
Published on: Sep 22, 2025 02:00 PM
