Coldrif Syrup Ban : लघवी होणंच थांबलं… खोकल्याच्या औषधामुळे 12 मुलं दगावली, ‘या’ सिरपवर 3 राज्यात बंदी, केंद्रानं स्पष्ट म्हटल…

Coldrif Syrup Ban : लघवी होणंच थांबलं… खोकल्याच्या औषधामुळे 12 मुलं दगावली, ‘या’ सिरपवर 3 राज्यात बंदी, केंद्रानं स्पष्ट म्हटल…

| Updated on: Oct 05, 2025 | 5:14 PM

केंद्र सरकारने दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप न देण्याचे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कोल्ड्रिफ आणि नेक्सा डीएस या कफ सिरपमुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानात 12 बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा आहे. इथिलीन ग्लायकॉल आणि डायथिलीन ग्लायकॉल हे घातक घटक आढळल्याने या सिरपवर बंदी घातली आहे.

केंद्र सरकारने दोन वर्षांखालील मुलांना कोणतेही कफ सिरप न देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश सर्व राज्यांना दिले आहेत. कोल्ड्रिफ आणि नेक्सा डीएस या दोन कफ सिरपमुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानात दोन वर्षांखालील 12 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या मुलांचे मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे म्हटले जात आहे.

या वादग्रस्त कफ सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉल आणि डायथिलीन ग्लायकॉल हे औद्योगिक कारणांसाठी वापरले जाणारे धोकादायक घटक आढळले आहेत. यामुळे मूत्रपिंड आणि मेंदूला गंभीर नुकसान होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांनी या कफ सिरपवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रातही 24 हजार लिटर कफ सिरपचा साठा नष्ट करण्यात आला आहे. दोन वर्षांखालील मुलांसाठी कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरांनाही इशारा देण्यात आला आहे.

Published on: Oct 05, 2025 05:13 PM