4 Minutes 24 Headlines | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची ईडी कडून चौकशी
गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे शुगर फॅक्टरी प्रकरणी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी होणार आहे.
मुंबई : आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्यामध्ये 500 कोटींचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा केल्याचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला. तसेच कुल यांचे प्रकरण ईडी, सीबीआयकडे द्या अशी मागणी करणारे पत्र संजय राऊत यांनी फडणवीस यांना लिहिले. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे शुगर फॅक्टरी प्रकरणी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. तर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापरासह शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज काँग्रेस राजभवनाला घेराव घालणार. जुन्या पेन्शनबाबत होणाऱ्या मोर्चाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक पार पडणार. या बैठकीसाठी विरोधकांनाही निमंत्रतीत करण्यात आले आहे. तर या बैठकीतच 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता.
