गुढीपाडव्याला मास्कमुक्ती होणार की नाही? काय म्हणाले आरोग्य मंत्री राजेश टोपे?

| Updated on: Mar 30, 2022 | 1:27 PM

राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण घटल्यामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मास्कमुक्ती होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. विविध संघटनांकडून राज्य शासनाकडे अशा प्रकारची मागणी देखील झाली आहे. यासंदर्भातील निर्णय महाराष्ट्रातील टास्क फोर्ससोबत चर्चा करून लवकरच घेतला जाईल, असं आश्वासन आरोग्यमंत्र राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलं आहे.

Follow us on

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण घटल्यामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मास्कमुक्ती होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. विविध संघटनांकडून राज्य शासनाकडे अशा प्रकारची मागणी देखील झाली आहे. यासंदर्भातील निर्णय महाराष्ट्रातील टास्क फोर्ससोबत चर्चा करून लवकरच घेतला जाईल, असं आश्वासन आरोग्यमंत्र राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलं आहे. गुढीपाडव्याला (Gudivada) आणखी तीन दिवस उरले असून तोपर्यंत यासंदर्भात तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल, नंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असं टोपे यांनी सांगितलं. मात्र गुढीपाडव्याला आपल्या कडे प्रत्येकाच्या घरी वैयक्तिकपणे गुढी उभारण्याची परंपरा असून त्या उत्साहाला कुठेही निर्बंध नाहीत. नागरिकांनी हा सण उत्साहाने साजरा करावा, असं टोपे यांनी सांगितलं.