विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यता

विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यता

| Updated on: May 07, 2022 | 9:51 AM

विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन दिवस विदर्भातील तापमानात वाढ होऊ शकते असे हवामान खात्याने म्हटले आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याचे पहायला मिळत आहे. विदर्भात तापमानाने उच्चांक गाठला आहे. नागपूर आणि चंद्रपूरमध्ये तर तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे पहायला मिळाले. दरम्यान आता पुन्हा एकदा पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात  आली असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  पुढील तीन दिवस विदर्भातील चंद्रपूर, वाशिम, अमरावती, अकोल या जिल्ह्यांमध्ये तापमान अधिक असणार आहे.

Published on: May 07, 2022 09:51 AM