मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला; सखल भागात पाणी साचले
मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत आणि आसपासच्या परिसरात पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई उपनगरातील बोरिवली,कांदिवली, अंधेरी भागात परिसरात पाणी साचलं आहे.
मुंबई: मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत आणि आसपासच्या परिसरात पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई उपनगरातील बोरिवली,कांदिवली, अंधेरी भागात परिसरात पाणी साचलं आहे. कांदिवलीतील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे.मुंबईत गेल्या तीन तासांपासून जोरदार पाऊस झाला आहे. पुढील तीन-चार तासांतही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. अनेक भागात वाहतूक ही संथ गतीने पुढे जात आहे. या पावसामुळे मुंबईतील महत्वाचा मार्ग आता बंद करण्यात आला आहे.
Published on: Jun 28, 2023 03:55 PM
