India VS Pak Asia Cup 2025 : तू बॉल टाक रे… अभिषेक शर्मानं आफ्रिदीला सुनावलं, भारत-पाक मॅचमध्ये घडलं काय?

India VS Pak Asia Cup 2025 : तू बॉल टाक रे… अभिषेक शर्मानं आफ्रिदीला सुनावलं, भारत-पाक मॅचमध्ये घडलं काय?

| Updated on: Sep 22, 2025 | 4:00 PM

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामन्यात हाय व्हॉलटेज ड्रामा पाहायला मिळाला. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने पाकिस्तानला मागे टाकलं.

भारताने आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने केलल्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर मात केली. अभिषेक शर्माने 74 धावांची जबरदस्त खेळी केली. तर शुबमननेही पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. या जोडीचं लक्ष भरकटवण्यासाठी पाकिस्तानकडून डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भारताच्या या सलामी जोडीने पाकिस्तानला बॅटने उत्तर दिलं. शुबमन आणि अभिषेकनंतर तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि संजू सॅमसन या तिघांनी भारताला विजय मिळवून देण्यात योगदान दिलं. भारताने विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवण्यास नकार दिला.

Published on: Sep 22, 2025 03:12 PM