मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

| Edited By: | Updated on: Mar 20, 2022 | 4:50 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी लवकरच महाराष्ट्र (maharashtra) पिंजून काढण्याचे संकेत दिले आहेत. आपण शिवसंपर्क अभियान गेल्यावेळीच राबवणार होतो. पण कोरोनाची लाट आली. त्यानंतर माझ्या मानेचं दुखणं उद्बवलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी लवकरच महाराष्ट्र (maharashtra) पिंजून काढण्याचे संकेत दिले आहेत. आपण शिवसंपर्क अभियान गेल्यावेळीच राबवणार होतो. पण कोरोनाची लाट आली. त्यानंतर माझ्या मानेचं दुखणं उद्बवलं. मात्र आता आपल्याला जोमाने कामाला लागायचं आहे. येत्या काही दिवसात मीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरलं. भाजपचं (bjp) हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी आहे. सत्तेसाठी मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत गेले होते हे विसरलात का? असा सवाल करतानाच सरकारचा संबंध दाऊदशी जोडणं चुकीचं असून विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Published on: Mar 20, 2022 04:50 PM