संविधानावर हल्ला होतोय : अरविंद सावंत

| Updated on: Mar 22, 2023 | 10:14 AM

गिरगावमध्ये पारंपारिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, देणाऱ्या शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत

Follow us on

मुंबई : हिंदू नववर्षाची सुरूवात म्हणजे गुढीपाडवा. मुंबईच्या गिरगावमध्ये मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर शोभायात्रेत सहभागी झाले आहेत. गिरगावमध्ये पारंपारिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, देणाऱ्या शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी संविधानावर हल्ला होतोय अशी टीका केली आहे.

सावंत यांनी, संविधान आमचा स्वाभिमान आहे, आमचा अभिमान, आमची सावली आहे. त्याच संविधानावर आज हल्ला होतोय. खास करून महाराष्ट्र धर्मावर हल्ला होतोय. महाराष्ट्राच्या अस्मितेवर, मराठी भाषेवर हल्ला होत असल्याचे सांगितलं आहे. तर गेली 8 वर्ष आपण सभागृहात नाना शंकरसेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला देण्याची मागणी करतच आहे. त्याच काय झाल? असा सवाल केला आहे.