वादळात मंडप उडाला, तरी भर पावसात पठ्ठ्यांचं आंदोलन सुरूच

| Updated on: Jun 06, 2023 | 12:26 PM

जळगावातील बांभोरी येथील हिताची ब्रेक सिस्टीम लिमिटेड या कंपनीच्या कामगारांचा बेमुदत संप सुरु होता. मात्र या आंदोलनावेळी वादळी वाऱ्यामुळे कामगारांच्या आंदोलन स्थळांचा मंडप उडून गेला. तरीही भर पावसात या ठिकाणी कामगारांनी जागेवरून न उठता आंदोलन सुरच ठेवले.

Follow us on

जालना : जळगावातील बांभोरी येथील हिताची ब्रेक सिस्टीम लिमिटेड या कंपनीच्या कामगारांचा बेमुदत संप सुरु होता. मात्र या आंदोलनावेळी वादळी वाऱ्यामुळे कामगारांच्या आंदोलन स्थळांचा मंडप उडून गेला. तरीही भर पावसात या ठिकाणी कामगारांनी जागेवरून न उठता आंदोलन सुरच ठेवले. पगार वाढ करावी, कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे यासह विविध मागण्यांसाठी बांभोरी येथील हिताची कंपनीच्या कामगारांचे बेमुदत संप सुरू आहे. पाचशेहून अधिक कामगारांचा या आंदोलनात समावेश आहे. या आंदोलनाला पंधरा दिवस उलटले तरी कामगारांच्या मागण्या कंपनी प्रशासनाकडून तसेच शासन पातळीवर मान्य झालेल्या नाहीत.कंपनी प्रशासन कुठलीही बोलणी करायला तयार नाही. तर दुसरीकडे संपर्क करणाऱ्या कामगारांच्या जागी नवीन कामगार भरती करत आहे. त्यात कामगार आयुक्त यांचेही दुर्लक्ष होत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही आंदोलन स्थळी कामगारांची भेट घेऊन मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यांच्याकडूनही दुर्लक्ष झाल्याचं कामगारांनी म्हटलं.. सोमवारी जळगावत तुफान वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली, यादरम्यान या आंदोलनाच्या ठिकाणचा मंडप संपूर्णपणे उडून गेला त्यानंतरही मुसळधार पावसात बसून कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याचे पाहायला मिळालं.