Maharashtra Honeytrap Scandal : हनी ट्रॅपमध्ये कोण? नावं सांगा, शिंदेंचा विरोधकांना सवाल
Maharashtra Honeytrap Scandal In Assembly : पावसाळी अधिवेशनात आज अधिकारी आणि नेत्यांच्या हनीट्रॅपचा मुद्दा चांगलाच गाजला.
पावसाळी अधिवेशनात आज अधिकारी आणि नेत्यांच्या हनीट्रॅपचा मुद्दा चांगलाच गाजला. हनीट्रॅपच्या मुद्यावर नाना पटोले यांनी विधान सभेत पेंड्राईव्ह बॉम्ब टाकला. मुंबईत मंत्रालय, ठाणे, नाशिक हे हनीट्रॅपचे केंद्रबिंदु असल्याचं पटोले यांनी यावेळी म्हंटलं. पेंड्राईव्ह आहे. पण कोणाचंही चारित्र्य हनन करू इच्छित नाही, असंही यावेळी नाना पटोले यांनी म्हंटलं. हनीट्रॅप सारख्या विषयात देखील सरकार गंभीर नाही. या प्रकरणी जयंत पाटील आणि भास्कर जाधव यांनी देखील विधानसभेत भाष्य केलं. तर विरोधकांनी केलेल्या या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल बोलताना सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे म्हणत या प्रकरणातली नावं सांगा? असा उलट सवाल विरोधकांना केला आहे. त्यामुळे हनीट्रॅपवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात काहीस वादंग बघायला मिळालं.
Published on: Jul 17, 2025 01:49 PM
