76th Republic Day celebration : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अश्वशक्ती दलाचं सादरीकरण, बघा लक्ष वेधून व्हिडीओ

76th Republic Day celebration : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अश्वशक्ती दलाचं सादरीकरण, बघा लक्ष वेधून व्हिडीओ

| Updated on: Jan 26, 2025 | 12:39 PM

आज कर्तव्य पथावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

देशभरात भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्य पथावर लष्करी संचलन पार पडत आहे. आज कर्तव्य पथावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण केले. यावेळी दिल्लीच्या कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात इंडोनेशियाचे मार्चिंग पथक आणि बँड पथकदेखील सहभागी झाले. तर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अश्वशक्ती दलाचं सादरीकरण देखील झाल्याचे पाहायला मिळाले. तर यासबोतच दिल्लीतील कार्तव्य पथावर प्रजासत्ताकदिनाच्या परेड दरम्यान बीएसएफचा उंटांचा ताफा आणि त्यानंतर बीएसएफ आणि एनसीसीच्या उंट पथकाचीही परेड पार पार पडली. कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात ‘सुवर्ण भारत – वारसा आणि विकास’ या कल्पनेवर आधारित चित्ररथांचे देखावे सादर करण्यात आले. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे १६ चित्ररथ असून तर केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि संघटनांकडून 15 चित्ररथ सादर करण्यात आले.बघा व्हिडीओ

Published on: Jan 26, 2025 12:32 PM