विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज, सरकारची हिटलरशाही, प्रवीण दरेकर यांची टीका

| Updated on: Jan 31, 2022 | 5:17 PM

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन घ्या यासाठी केलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करणे म्हणजे ही हिटलरशाही असल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. सामोपचाराने यावर तोडगा न काढता पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेला लाठीचार्ज हा इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदविला जाईल असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Follow us on

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन घ्या यासाठी केलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करणे म्हणजे ही हिटलरशाही असल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. सामोपचाराने यावर तोडगा न काढता पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेला लाठीचार्ज हा इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदविला जाईल असे मतही त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवणे गरजेचे असून त्यावर लवकर तोडगा काढण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. विद्यार्थी आपल्या न्याय हक्कांसाठी लढत असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करणे हे लोकशाहीचे लक्षण नसून ही हिटलरशाही असल्याची टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली. हे सरकार त्यांच्या मनात येईल तसे वागत आहे. विद्यार्थ्यांचा विचार न करता त्यांच्यावर लाठीचार्ज करणे हे चुकीचे असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे असे सांगितले.