मी माफी मागणार नाही, कशासाठी माफी मागायची?- अमोल मिटकरी

| Updated on: Apr 21, 2022 | 2:10 PM

लग्नाच्या विधीवरुन केलेल्या वक्तव्यामुळे एकीकडे अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांच्यावर भाजपनं टीका केली. तर दुसरीकडे आज पुण्यात ब्राम्हण महासंघाचे (Brahman Mahasangh) कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयावर (NCP Office Pune) धडकले.

Follow us on

लग्नाच्या विधीवरुन केलेल्या वक्तव्यामुळे एकीकडे अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांच्यावर भाजपनं टीका केली. तर दुसरीकडे आज पुण्यात ब्राम्हण महासंघाचे (Brahman Mahasangh) कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयावर (NCP Office Pune) धडकले. यानंतर सगळ्या वक्तव्याप्रकरणी अमोर मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. राज्यपाल महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल बोलले, त्याबद्दल तुम्ही बोलले नाही, पुरंदरेंच्या लिखाणावर बोलले नाही, असं म्हणत चिमटे काढलेत. ‘ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी सगळं तपासावं. कन्यादान हा कन्या दान विरोध करण्याचा विषय नाहीय, स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चारला तो मी सांगितला, माझा पूर्ण व्हिडीओ पाहावा, कुठल्याही समाजावर टीका केली नाही, असंही अमोल मिटकरी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय. दरम्यान, माफी मागण्याच्या मुद्द्यावर बोलताना अमोल मिटकरांनी, कशाची माफी मागायची? असा उलट सवाल विरोधकांना विचारला आहे.