हल्ले करून आमचा आवाज दाबता येणार नाही : देवेंद्र फडणवीस

हल्ले करून आमचा आवाज दाबता येणार नाही : देवेंद्र फडणवीस

| Edited By: | Updated on: Apr 25, 2022 | 1:47 PM

हिटलरसारखं (Hitler) कुणी वागत असेल, तर संवादापेक्षा संघर्ष बरा, अशा धार-धार शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सोमवारी हल्लाबोल केला.

हिटलरसारखं (Hitler) कुणी वागत असेल, तर संवादापेक्षा संघर्ष बरा, अशा धार-धार शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सोमवारी हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले की, ज्या काही घटना मुंबईत आणि महाराष्ट्रात पाहतोय. त्या घटना पाहिल्यानंतर, या सरकारने संवादासाठी जागा ठेवलीय, असं आम्हाला वाटत नाही. जर कुणी हिटलरी प्रवृत्तीने वागायचं ठरवलं असेल, तर संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा. यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातलाय. विरोधी पक्षाला जीवानिशी संपवायचं, अशी सरकारची प्रवृत्ती असेल. आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जीवे मारण्यासाठी पोलिसांसमोर हल्ले होणार असतील आणि एफआयआर नोंदवण्यासाठीही संघर्ष करावा लागत असेल, तर अशा बैठकीत जाऊन फायदा काय, असा रोखठोक सवाल त्यांनी केला.