Uday Samant | वैयक्तिक टीका कराल तर परिणाम भोगाल, उदय सामंतांचा राणेंना इशारा

Uday Samant | वैयक्तिक टीका कराल तर परिणाम भोगाल, उदय सामंतांचा राणेंना इशारा

| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 6:50 PM

राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यानंतर आता शिवसेना नेते उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना इशारा दिलाय. संघर्ष टाळण्यासाठी तशाच पद्धतीने वागलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे.

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक आणि जामीनावर सुटका, या घडामोडीनंतर राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु झालीय. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यानंतर आता शिवसेना नेते उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना इशारा दिलाय. संघर्ष टाळण्यासाठी तशाच पद्धतीने वागलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे. आमची भूमिका प्रामाणिक आहे. जशी अॅक्शन तशी रिअॅक्शन व्यक्त होत असते, अशा शब्दात उदय सामंत याांनी राणेंना इशारा दिलाय.