Rain Updates : कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन

Rain Updates : कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन

| Updated on: Jun 13, 2025 | 4:29 PM

Weather Updates in Maharashtra : राज्यभरातील हवामान पालटण्याचे संकेत असून हवामान खात्याने अनेक भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोकण किनारपट्टीसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे. काल रात्रीपासून कोकण किनारपट्टीवर पावसाच्या सरी बरसताना बघायला मिळत आहेत. आज आणि उद्या असे 2 दिवस मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

हवामान खात्याने राज्यभरातील हवामान पालटण्याचे संकेत दिले आहेत. हवामानात होणाऱ्या बदलानुसार, शुक्रवारी रत्नागिरीला रेड, शनिवारी रायगडसह रत्नागिरीला तर रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी विदर्भासह कोकण व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून, हवामानातील बदलामुळे विजांच्या कडकडाटासह वादळ, वादळी वारे ताशी ६० किमी वेगाने वाहतील. कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आहे.

Published on: Jun 13, 2025 04:29 PM